देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे येथील रहिवासी सुषमा बाळकृष्ण पारकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हिंदळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. देवगड पंचायत समितीचे माजी सभापती सुनील (भाई) पारकर यांच्या त्या आई होत.





