देवगड : कुणकेश्वर येथील खडकाळ भागामध्ये एक पुरुष जातीचे शव मिळून आलेले आहे. मालवण येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे हे शव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खडकात अडकलेल्या सदर शव ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढले. याबाबत सर्व माहिती पोलीस स्टेशन प्रभारीना देताच मालवण पोलीस स्टेशनकडील लापत्ता रजिस्टर नंबर 13/2023 मधील लापत्ता याचे भाऊ व नातेवाईक हे समक्ष कुणकेश्वर येथे येऊन त्यांनी मिळून आलेल्या शवाचे निरीक्षण व पाहाणी केली असता सदरचे शव हे त्यांचा भाऊ नमा केपा मुंडा (मुळ रा. सुंदरगड, ओडिशा, सध्या राहणार मालवण) याचेच असल्याचे ओळखून सांगितलेले आहे. त्याप्रमाणे संबंधितांचे DNA नमुने प्राप्त करून घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.








