सावंतवाडी : मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर सावंतवाडीसह वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन गणरायाचे दर्शन घेत आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून श्री. उपरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या आरती संग्रहाचे अनावरणही त्यांच्याहस्ते गणरायच्या साक्षीने करण्यात आले.

यावेळी सावंतवाडीचे माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव निलेश देसाई, सहसचिव आबा चिपकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत, स्वप्निल कोठावळे, मंदार नाईक, प्रकाश साटेलकर, नंदू परब, सुनील नाईक, ज्ञानेश्वर नाईक आदीसह मनसे सैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.








