अजित पवार गैरहजर! ; अमित शहा यांची फडणवीस-शिंदेंसोबत ४५ मिनिटे चर्चा.

34

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत ४५ मिनिटे चर्चा केली. यावेळी अजित पवार मात्र गैरहजर होते. अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीवस यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबतही महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. बैठकीत अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना केल्या. तसेच राज्यातील सर्व ४८ जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले.