सावंतवाडी मळेवाडचा प्रथमेश पुणेत गाजवतोय खेळांचे मैदान.! ; विविध खेळांत मिळवले प्राविण्य.!

195

पुणे : समर्पण, परिश्रम, त्याग, दृढनिश्चय आणि आत्मविश्वास असावा तर प्रथमेशसारखाचं. प्रथमेश चंद्रकांत नाईक मूळ सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावाचा रहवासी आहे. पण शिक्षणाकरिता तो पुण्यात फर्गुस्सून कॉलेजमध्ये शिकत असून , कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. प्रथमेशला ‘बेस्ट स्पोर्ट्समैन ऑफ द इअर २०२२-२३’ च्या पुरस्काराने नुकतेच  गौरविण्यात आले आहे. त्याच्या खेळात असलेली प्रगती आणि त्याचं यश पाहता त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रथमेश हा बरेच खेळ खेळतो. क्रिकेट ह्या खेळात तर त्याने अंडर – १९ राज्याच्या टीममधून प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर इंटर कॉलेज गेम्समधून बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, कबड्डी, हँडबॉल आणि फुटबॉल यासारख्या खेळात देखील यश प्राप्त केलं आहे. बॅडमिंटनमध्ये सेमीफायनलपर्यंत आणि ऍथलेटिक्स इव्हेंट्स मध्ये १०० मी. मध्ये ‘सिल्व्हर’ (२रा) आणि २०० मी. मध्ये ‘गोल्ड’ (१ला) अशी त्याने पदकं मिळविले आहेत. त्यासोबत तो क्रिकेटचे क्लब टुर्नामेंट आणि ‘पीवायसी’कडून खेळत होता. २०२२-२३ या वर्षात त्याने १८ सामने खेळले. त्यात त्याने २ शतकं, ६ अर्धशतकं आणि २२ विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही केले आहे. प्रथमेश ने २ टुर्नामेंटमध्ये टीमचे कर्णधारपद भूषवले. क्लब टुर्नामेंट आणि कॉलेज टुर्नामेंट दोन्ही वेळेस त्याने कर्णधारपद चांगल्या रितीने हाताळत आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत पोहोचवले आहे. सेमीफायनल जिंकली नसली तरी अलौकिक पद्धतीने डोकं लाऊन गेम कसा जिंकायचा?, हे त्याला चांगल जमतं. त्याला शेवटपर्यंत लढायच कसं? हे देखील चांगलचं ठाऊक आहे. क्लब गेम्समध्ये सेमीफायनल सामन्यात त्याच्या हाताला दुखापद होऊन पण तो पेन किलर घेऊन मैदानावर खेळायला उतरला आणि १७ चेंडूत ३२ धावा आणि २ विकेट्स अशी अप्रतिम खेळी त्याने केली. त्याचंबरोबर ९४ मी. लांब षटकार मारून टुर्नामेंटचा सर्वात लांब षटकार म्हणून एक रेकॉर्डही आपल्या नावावर केला. त्याचे खेळाविषयी कौतुक करावे तितके कमीच आहे. याचबरोबर केदार जाधव सरांचे उत्तम मार्गदर्शनही प्रथमेशला लाभले आहे. तसेच फर्ग्युसन कॉलेजकडून त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.