इन्सुली खामदेव नाका गणेश मंदिरात गणेश जयंतीचा उत्साह…!

बांदा : गणेश मंदिर इन्सुली खामदेव नाका येथील माघी गणेश जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेली पाच वर्ष नवसाला पावणाऱ्या या गणपतीचे माघी गणेश उत्सवात हजारो भाविक दर्शन घेऊन आपले नवस फेडतात.
आज दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ५.०० वा. महापूजा व आरती, सकाळी ६.०० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम, सायं. ठीक ५ वा. श्री देवी माऊली मुळपुरूष ब्राम्हण माया प्रासादिक भजन मंडळ सायं. ठीक ६ वा. रवळनाथ माऊली समर्थ प्रासादिक भजन मंडळ तसेच रात्रौ ठीक ९ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा महान दणदणीत पौराणिक नाट्यप्रयोग शिव कवच हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहननवदुर्गा कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

मोठ्या उत्साहात हजारो भाविकांनी नवसाला पावणाऱ्या या गणरायाचे दर्शन घेऊन आपले नवस फेडले. भाविकाने गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपले मागणे ही मागले आहे. सर्व भाविकांनी दुपारच्या महाआरतीचा लाभ घेऊन महाप्रसाद घेतला. गणरायाच्या दर्शनाला आजूबाजूच्या गावातून हजारो भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. अत्यंत उत्साहात भक्तीमयवातावरणात माघी गणेशोत्सव इन्सुली खामदेव नाका येथे साजरा होत आहे. नवदुर्गा कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांनी या उत्सवात तन-मन धनाने सहकार्य केले आहे.