कणकवली : उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल कणकवली येथे जवळील कनेडी येथे राडा झाला होता. त्यानंतर आज मात्र या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
भाजप कार्यालयामध्ये गणेश जयंती उत्सव सुरू असून भाविक मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झाले आहेत . मात्र, शिवसेना कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, काल झालेल्या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.





