शिवम पॅनल चे सर्व उमेदवार निवडून येतील |आमदार नितेश राणेंना विश्वास…

देवगड: दि देवगड को-ऑपरेटेड बँक लिमिटेड या बँकेची 29 जानेवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे देवगड दि अर्बन बँकेच्या विकासासाठी लढत आहे. बँकेचे जे सभासद आहेत त्यांना योग्य पद्धतीचा पारदर्शक कारभार देण्यासाठी शिवम पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढत आहोत, वर्षानुवर्षे राष्ट्रवादीचे नेते नंदूशेठ घाटे व आमदार अँड अजित गोगटे हे सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल या दृष्टीने वर्षानुवर्षे हा कारभार करत आहेत.

जिल्हा बँकमध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. मी स्वतः व संचालक मंडळ जिल्हा बँकेच्या माध्यमातून सामान्य नागरिक व शेतकरी यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन व त्यांचा विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही करतोय. सहकाराच्या लोकांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने जिल्हा बँकेत सत्ता दिली. त्याप्रमाणेच देवगड अर्बन बँकेची सत्ताही मिळवायची आहे. यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार घाटे देखील आपल्या सोबत आहेत.

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे मिळून शिवम असे पॅनल करण्यात आले आहे . सर्वच्या सर्व उमेदवार सक्षम असल्याने अर्बन बँकेचा चांगल्या पद्धतीने कारभार पाहतील असा विश्वास व्यक्त केला.तसेच शिवम पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले. देवगड येथील आमदार संपर्क कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.