कुडाळ : उपरकर शूटिंग अकॅडेमीच्या कु. राजकुमारी बगळे हिची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तर खुशल सावंत याची 10 मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच अहमदाबाद, गुजरात येथे संपन्न झालेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्गतील नेमबाज सहभागी झाले होते. यात कु. राजकुमारी संजय बगळे (कुडाळ) हिची एअर पिस्तूल प्रकारात 400 पैकी 342 गुणांसह मुलींच्या सब युथ गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली झाली आहे. ही खेळाडू वेंगुर्ला येथील उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये नेमबाजीचा सराव करत आहे.










