देवगड : मुणगे मसवी येथे मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके या युवकाचा खून प्रकरणी संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अवघ्या १२ तासात ओरोसच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हा गुन्हा किशोर परशुराम पवार, रा. कुंभारमाठ, ता. मालवण याने केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.










