सोशल माडियात प. पू. भालचंद्र महाराज यांच्या रूपांतील बाप्पाच्या मूर्ती व्हायरल..!

40

कणकवली : गणेशमूर्तिकारांनी विविध देवदेवातांसह साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, जय मल्हार यांसह अन्य रुपात गणेशमूर्ती तयार केल्या. त्या मूर्ती लक्षवेधी ठरल्या होत्या. यंदा कलमठ – गुरववाडी येथील गणेशमूर्तीकार समीर गुरव यांनी योगी यांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांच्या रुपातील गणेशमूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी कार्यशाळेत बाबांच्या भक्तांची गर्दी होत आहे. समीर गुरव यांनी भालचंद्र महाराज यांच्या रुपातील गणेशमूर्ती आपल्या कार्यशाळेत तयार केली आहे.