मिठबाव अद्यापक विद्यालयात वार्षिक परीक्षेत सायली वळंजु प्रथम.!

153

देवगड : महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे यांच्या वतीने जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल. एड. वार्षिक परिक्षामध्ये
के. एम. एस अद्यापक विद्यालय मिठबावचा निकाल 88% लागला आहे. यात प्रथम क्रमांक सायली दीपक वळंजू (80.70%), द्वितीय क्रमांक श्रेया विजय वारीक (79.20%) तर तृतीय क्रमांक भार्गव महेश सावंत (73.40%) यांनी पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य बी. के. चव्हाण तसेच सर्व अध्यापकाचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.