‘श्री’चे खरे उपासक तहसीलदार ‘श्रीधर पाटील’ .!; चक्क रविवारी कामकाज सुरू..!

220

रुपेश पाटील..

सावंतवाडी : आजकाल सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. कोकणातील गणेशोत्सवाची महती सर्वश्रुतच आहे. आद्य श्री गणेशाच्या आगमनाची आतुरता तमाम कोकणवासियांना लागलेली असते. बाप्पाचं आगमन अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना आज रविवार अर्थात सुट्टीचा दिवस असतानाही सावंतवाडी तालुक्याचे कर्तबगार तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपले कार्यालय नियमित सुरू ठेवले आहे.

आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या मागणीप्रमाणे न्याय देण्याचे आणि आपल्या कर्तव्याशी इमान इतबारे कार्य करण्याच्या सूचना सावंतवाडीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे. खरोखरच ज्यांच्या नावातच ‘श्री’ आहे असे श्रीधर पाटील प्रत्येक तालुक्याला तहसीलदार म्हणून लाभावेत, अशीच श्री गणरायाचरणी प्रार्थना प्रत्येक काम घेऊन येणाऱ्या नागरिकांनी नक्कीच केली असेल, असे आदर्श कार्य तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांच्या टीमने हाती घेतले आहे.

‘मनुष्य जन्म एकदाच लाभावा आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळावा.!’ अशी ख्याती असणारे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीधर पाटील आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्यप्रणालीमुळे परिचित झाले आहेत. अशा कर्तबगार आणि सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ‘महाराष्ट्र माझा टीम’चा मनस्वी सलाम आणि त्यांच्या भावी कार्यास हृदयपूर्वक शुभेच्छा..!