श्रीलंकेला सिराज वादळाने फायनलमध्ये केले उध्वस्त..!

67

कोलंबो : 19 दिवस चालणाऱ्या आशिया कप स्पर्धेतील 13वा आणि शेवटचा सामना आज भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विजेतेपदाच्या लढतीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होईल.

भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळी भारताने 2018 मध्ये आशिया कप जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा हे विजेतेपद जिंकण्यासाठी टीमची नजर असेल.

मोहम्मद सिराजने सामन्याच्या चौथ्या षटकात लंकेची पार दैना उडवून दिली. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निसंकाला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा आणि चौथ्या चेंडूवर असलंकाला बाद केले. सिराज आता हॅट्ट्रिक करणार असे वाटत होते. मात्र धनंजया डिसेल्वाने चौकार मारत सिराजची हॅट्ट्रिकची संधी हिरावून घेली. मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने धनंजयाला पॅव्हेलियनमध्ये पाठवत लंकेची अवस्था 5 बाद 12 अशी केली.

त्यानंतर त्याने सहाव्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याचा त्रिफळा उध्वस्त करून 5 गडी बाद करण्याची सुवर्ण कामगिरी केली आहे. आता श्रीलंकेची अवस्था 7 षटकात 6 गडी गमावून 17 धावा अशी झाली आहे.