श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरास कुलर भेट .! ; उद्योजक रुपेश सावंत, सुशांत नाईक यांचा पुढाकार.

40

देवगड : कोकणची दक्षिण काशी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून श्री देव कुणकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक भाविक कुणकेश्वरला येत असतात. त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी मिळाव्यात यासाठी कुणकेश्वर मंदिर परिसरात मुंबई येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या वतीने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी थंड पाण्याचा कुलर भेट देऊन देण्यात आला.

याचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुणकेश्वर मंदिरासाठी लागणारी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले.
यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अभय पेडणेकर, सचिव शरद वाळके, सदस्य संजय आचरेकर, संतोष लाड, व्यवस्थापक रामदास तेजम, कुणकेश्वर ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांत घाडी, ग्रामपंचायत सदस्य सायली वाळके, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, संजय वाळके, अँड सिद्धेश माणगावकर, नगरसेवक विशाल मांजरेकर आदी उपस्थित होते.