कोलंबो : आशिया कप 2023 अंतिम सामना 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघात एका नव्या खेळाडूची अचानक एन्ट्री होणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आहे ज्याला श्रीलंकेत बोलावण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला दूखापत झाली होती. मैदानावरच त्याला अनेकवेळा वैद्यकीय पथकाची मदत घ्यावी लागली. अक्षर पटेल अंतिम फेरीत खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र क्रिकबझच्या मते, अक्षर पटेल भारत-श्रीलंका अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुंदरला कोलंबोला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.





