पवित्रद्वारे शिक्षक पदभरती ‘स्व- प्रमाणपत्र’ पूर्ण करण्यासाठी २२ सप्टेंबर अखेर मुदतवाढ.!

128

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीसाठी शासनाने “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती; त्यापैकी २.१६.४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

ही चाचणी दिलेल्या उमेदवारांना दिनांक १/९/२०२३ ते दिनांक १५/९/२०२३ या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा दिलेली आहे. तथापि राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नाही तसेच दिनांक १४/०९/२०२३ रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही, ही बाब विचारात घेता स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक २२/०९/२०२३ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे.

तसेच हे प्रमाकीकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. त्यास उत्तर देण्यात येईल यासाठी कोणाही कर्मचारी अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये.

वर नमूद केलेल्या कालावधीत जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.

यास्तव “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” ही चाचणी दिलेल्या उमेदवारांनी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन दिनांक २२/०९/२०२३ अखेर आपली कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.