जीवनपट उलगडणार्‍या चित्र प्रदर्शनाने बाळासाहेब ठाकरेंना वाहीली अनोखी आदरांजली…!

देवगड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अखंड जीवन हे हिंदुत्वासाठी समर्पित होते. प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत. शिवसेनेने प्रत्येकवेळी संघर्षातूनच यश मिळवलेले आहे. कठीण काळातही एकसंघ राहण्याची शिकवण शिवसैनिकांनी आजही जोपासली आहे हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड तालुका तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी शिरगाव येथे केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिरगाव येथील विभागीय कार्यालयात सोमवारी साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट व शिवसेना पक्षाच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणारे फोटो प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी बोलताना उपतालुका प्रमुख रविंद्र जोगल म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात कोरलेले आहेत. कसोटीच्या काळातील हे ही दिवस निघून जातील. राजकारणापेक्षा विकासाबरोबर समाजकारणाची कास सर्वांनी जोमाने धरूया. शिवसैनिकांची एकजूट हीच खरी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली.

या कार्यक्रमास तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल, विभागप्रमुख सुरेंद्र तावडे, शाखाप्रमुख महेश मेस्त्री, माजी उपसभापती अमित साळगांवकर, माजी शाखाप्रमुख रघुनाथ साटम, शिरगाव-शेवरे ग्रामपंचायतीचे सरपंच समिर शिरगांवकर, ओंबळ सरपंच अरुण पवार, माजी सरपंच संजय रुपये, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे, बुथप्रमुख प्रथमेश तावडे, मंगेश शिंदे, हरी चव्हाण, सुर्यकांत तावडे, राजेद्र पोकळे, मनोज चव्हाण, माजी विभागप्रमुख विक्रांत नाईक यांच्यासह विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित राहून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.