मालवण अध्यापक विद्यालयाच्या पाककृती स्पर्धेत आकांक्षा पांचाळ अव्वल.! ; तृणधान्य, भरडधान्य पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न.

213

मालवण : येथील सुनितादेवी टोपीवाला अध्यापक विद्यामंदिरात आज शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तृणधान्य, भरडधान्य पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. यात अध्यापक विद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य हेमंत प्रभू यांनी केले. यावेळी व्यासपीठावर परीक्षक सौ.गोसावी मॅडम, सौ. राळकर मॅडम यांच्यासह शिक्षक प्रशिक्षक प्रा. डी. एम. माळी, प्रा. नागेश कदम, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. आर. एस. वळवी केले. स्पर्धेचे आयोजन प्रा.आनंदी घोगळे व प्रा. पूर्वा शिरसाट यांनी केले.  यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पाककला स्पर्धेचा निकाल असा :

आकांक्षा पांचाळ — प्रथम.
संजीवनी पांचाळ — द्वितीय.
माधवी तिरोडकर — तृतीय.