बांदा : श्री. मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला.
यावेळी चिमुकल्यांनी ‘वह किसना है..!’ या गाण्यावर इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. तसेच जल्लोषत दोन थोरांची दहीहंडी फोडण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी या उत्साहात भाग घेतला. नर्सरी ते चौथीपर्यंत सर्व विद्यार्थी राधाकृष्ण चा वेशभूषा आले होते. सूत्रसंचालन नीती साळगावकर तर प्रतीक्षा शिरोडकर यांनी आभार मानले. यावेळी प्रशालेचे मुख्यध्यापिका सौ. नीती साळगावकर, सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर वैलांकानी रॉड्रिग्ज, तेजस्वी गावडे व प्राची परब आणि पालक उपस्थित होते.





