अभिनंदनीय – कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांचा मंत्री केसरकर यांच्या हस्ते सन्मान..!

266

सावंतवाडी : तालुक्यातील केसरी आणि सातुळी येथील शेतकऱ्यांसाठी मागील तीन वर्षांमध्ये अत्यंत भरीव योगदान देणारे आणि शासनाच्या विविध योजना जसे की शासनाच्या महाडीबीटी विकास महाडीबीटी ,कोरड वाहू क्षेत्र विकास, शेतीशाळा, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, भाजपाला लागवड अशा अन्य योजना तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी झटणारे तांबुळी येथील कृषी सहाय्यक मिलिंद सुरेश निकम यांचा आज कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते ओरोस येथे सत्कार करणात आला.