ठाण्याच्या हायलँड पार्कमध्ये दुर्घटना ; सहा लोकांचा मृत्यू..!

59

ठाणे : ठाण्यामधील हायलँड पार्क या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीत लिफ्ट कोसळल्याने ६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत ४० मजल्याची असून एक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही घटना ठाण्याच्या बाळकुम भागातील हायलँड पार्कमधील इमारतीत घडला. या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या इमारतीत काम सुरु होतं, ४०व्या मजल्यावरुन सात कामगार खाली येत होते, त्यावेळी मध्येच या लिफ्टची केबल तुटली आणि लिफ्ट कोसळली. यामध्ये ६ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्य एक कामगार गंभीररित्या जखमी झाला आहे.