वैभववाडीत ‘डेंग्यू’ वरुन ठाकरे गट आक्रमक.!

26

वैभववाडी : तालुक्यात डेंग्यू टायफॉइडसह तापसरीची साथ सुरू असताना आरोग्य विभाग सुस्तावलेला आहे. ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तोंडसुख घेतले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी तत्काळ वैभववाडीत यावे, अशी मागणी त्यांनी केली. वैभववाडी तालुक्यात सध्या तापसरीची साथ सुरू आहे. शासकीय रुग्णालये व खासगी दवाखान्यांना जत्रेचे स्वरूप आलेले आहे.