BIG NEWS – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक.!

76

हैदराबाद : टीडीपी पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश सीआयडीने अटक केली आहे. अटकेचे कोणतेही थेट दृश्य समोर येऊ नये यासाठी एपी पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांनी सांगितले की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह आढळल्यानंतर सीआयडीने चंद्राबाबूंना वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. आम्ही जामिनासाठी उच्च न्यायालयात जात आहोत, असे ते म्हणाले. त्यांच्यावर जनतेच्या पैशाची ‘लूट’ केल्याचा आरोप केला आहे.