Home महाराष्ट्र कणकवली कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकेल ! – संदेश पारकर.

कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकेल ! – संदेश पारकर.

38

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या चारही तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. आम्ही दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार आहोत. ज्या मालवण मध्ये राणेंचा पराभव नाईक यांनी केला. त्याचप्रमाणे , अशी संघटना बांधणी केली जाईल, असा विश्वास संदेश पारकर यांनी येथे व्यक्त केला.