सावंतवाडी : इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ने खलाशी (जनरल ड्युटी), खलाशी आणि मेकॅनिकलच्या 350 पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 08 सप्टेंबर 2023 पासून सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे.





