नवी दिल्ली : स्वत:ला हिंदू असणाऱ्यावर गर्व असल्याचे म्हणणारे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन सरकार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले ‘वाघ नख’ भारताला परत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी हे वाघ नख वापरले होते. ते परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार 1 ऑक्टोबरला लंडनला जाणार आहेत.





