प्रा. एल. पी. पाटील यांचं दातृत्व .! ; आरपीडी कॉलेजला १२० पुस्तकांची देणगी.!

46

सावंतवाडी : येथील आरपीडी ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राध्यापक अकाउंट्स विषयाचे तज्ञ एल. पी. पाटील यांनी बुक किपींग & अकाउंटन्सी या विषयाची १२० पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला विनामुल्य भेट दिली. या पुस्तकांची किंमत ४२ हजार एवढी आहे. ही पुस्तके १२ वी कॉमर्ससाठी उपयुक्त असून या पुस्तकाचे लेखकही प्रा. एल. पी. पाटील आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर ही पुस्तके Key To Sure Success यासाठी वापरली जातात. त्यांच्या या देणगीबाबत मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी प्रा. पाटील यांचे आभार मानले.