वैभववाडीत ‘डेंग्यू-टायफॉईड’चा धुमाकूळ..!

43

वैभववाडी : तालुक्यात डेंग्यू टायफॉईड आणि वातावरणातील बदलाच्या तापसरीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील शासकीय रुग्णालये व खासगी दवाखान्यांना सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. अशाही परिस्थितीत आरोग्य विभाग सुस्तावलेला. डेंग्यूच्या रुग्णांची निश्चित आकडेवारी या विभागाकडे नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात हा विभाग कुचराई करीत आहे. तालुक्यात सध्या तापसरीने शकडो रुग्ण आढळून येत आहेत. महिनाभर तापसरीची साथ आहे.