कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे नुकत्याच आयोजित जिल्हास्तरिय शालेय स्पर्धेत कुमार आदित्य अच्युतराव वनवे (१४ वर्षाखालील मुलगे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आदित्यची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्यचे संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे,पर्यवेक्षक सौ. व्ही. व्ही. जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वर्गाने अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुदीन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.





