बॅ. खर्डेकर महाविद्यालयात गुंतवणूक विषयक कार्यशाळा संपन्न..!

23

वेंगुर्ला : विद्यार्थ्यांनी गुंतवणूक साक्षर व्हावे यासाठी अर्थशास्त्र विभाग आणि गणित व संख्याशास्त्र विभाग यांच्या वतीने आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या सहकार्याने बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयामध्ये गुंतवणूक विषयक कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच उद्घाटन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तज्ञ मार्गदर्शक हेमंत जांभळीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. बी. चौगुले, गणित आणि संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवात्रे, सेबीचे संदीप जाधव, प्रा. देविदास आरोलकर, प्रा. जी.पी. धुरी, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. के. आर. कांबळे, प्रा. रिया टेमकर आधी उपस्थित होते.
योग्य आर्थिक निर्णय व्यक्तीला समर्थ करतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं जीवन कौशल्य म्हणजे आर्थिक नियोजन. हेमंत जांभळीकर यांनी याविषयी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रा. एम. आर. नवात्रे यांनी प्रकट केलं.