वेंगुर्ला : तालुक्यातील जि. प. पू. प्रा. केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी येथे कार्यरत असलेल्या उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांचे शिक्षण M.A., M.Ed. झाले असून त्या UGC-NET परीक्षा देखील उत्तम गुणांनी पास झालेल्या आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरल्या आहेत. तसेच त्यांनी हिंदी पंडित उत्तीर्ण, DSM (Diploma in School Management) देखील पूर्ण केले असून त्या MSCIT, कबड्डी पंच परीक्षा जिल्हास्तर उत्तीर्ण आहेत.
त्यांनी लॉकडाऊन कालावधीमध्ये कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावले आहे. तसेच लॉकडाऊन कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाह अखंडीत सुरू ठेवून सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर घेतले आहेत. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुकास्तरीय मार्गदर्शन केले असून त्यांना नाटूकल्यांचे लेखन, कविता, निवेदन, सूत्रसंचालन करण्याची आवड आहे. विविध साहित्यिक समूहावर काव्यलेखन, चारोळीलेखन, उखाणी, षटकोळी, आठोळी, दशपदी काव्य, अष्टाक्षरी काव्य रचना, अभंग रचना, शिरोमणी काव्य, द्रोण काव्य, त्रिवेणी काव्य, प्रभातपुष्प सादर सुरू करून साहित्य सेवा केली आहे.
मराठी साहित्य मंच ई-बुक काव्यसंग्रहात स्वलिखित कविता व चारोळ्या प्रकाशित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याद्वारे प्रकाशित ‘कोविड शिक्षण’ या पुस्तकामधून कोविड जनजागृती विषयक लेख प्रसिद्ध, विविध राज्यस्तरीय साहित्य समूहांमध्ये ऑनलाईन काव्यलेखन, चारोळ्या करून सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे अनेक पुरस्कार प्राप्त. साहित्य संपदा आयोजित ऑनलाईन विश्वविक्रमी काव्यसंमेलनात सहभाग. आकाशवाणीवर स्वलिखित कवितांचे प्रसारण. राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षण केले आहे. त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर असून त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून लेख प्रसिद्ध केले आहेत. डिजिटल मिडीयावर (ब्लॉक) लेख प्रसिद्ध तसेच त्यांनी शाळेमध्ये वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. शालेय स्तरावर विविध विषयावर शालेय विद्यार्थ्यांची पथनाट्ये व जाणीव जागृती, दहीहंडी, ख्रिसमस व इतर कार्यक्रमांची आयोजन करून त्याद्वारे मुलांमध्ये सर्वधर्मसमभावाची भावना निर्माण करण्याचे काम करते त्यामध्ये पालकांनाही सामावून घेतले आहे.
मुलांना कार्यानुभवाच्या माध्यमातून टाकाऊतून टिकावू वस्तू कशा बनवता येतील यातून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण केले आहे. इयत्ता ५ ते ७ वी विद्यार्थिनींसाठी गुड टच / बैंड टच व्हिडीओद्वारे मार्गदर्शन. इयत्ता ४ ते ७ वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना कॉम्प्युटर हाताळण्याचे (Paint, Ms-office) मार्गदर्शन. मुलांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये (मॅरेथॉन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इ.) भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. शाळेसाठी दात्यांकडून एक स्मार्ट टीव्ही, २० लीटर क्षमता असलेला वॉटर फिल्टर, लाकडी कपाट, ऑफीस खुर्ची, मुलांना गणवेश, दप्तर व शाळेला इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बालवाचनालयासाठी कथा पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत दाते शोधून त्यांच्यामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास व होतकरू मुलींना त्याचा लाभ मिळवून दिला आहे. त्यापैकी माझ्या कुटुंबाने एका मुलीला दत्तक घेतले आहे. तसेच कुटुंबाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील हुशार व गरजू विद्यार्थिनींना शालोपयोगी वस्तू व साहित्य देऊन प्रतिवर्षी मदत करत असतात. किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, त्यादरम्यान घ्यावयाची काळजी, मासिकपाळी विषयी असलेल्या अंधश्रद्धा इत्यादी विषयक मातापालकांना मार्गदर्शन असे अनेक उपक्रम शामल मांजरेकर यांनी राबविले असल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व कार्याची नोंद शिक्षण विभागाने घेऊन त्यांची यंदाचा जि.प.च्या आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड केली आहे.





