जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज आपला निर्णय सांगणार असल्याचं सांगितलं होतं. निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर जरांगे यांच्या निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष लागलं होतं. पण मनोज जरांगे आपल्या आंदोलन आणि उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, वंशावळीची अट ठेवू नये, अशी मागणी यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी केली आहे.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. वंशावळीचे दस्ताऐवज अनेक लोंकाकडे नाहीत. तर वंशावळीची अट ठेवू नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण त्यामध्ये थोडा बदल करण्यात यावा, सरकारने तो बदल करून घ्यावा त्यानंतर आम्ही निर्णय घेतो असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने गुरूवारी (ता.६) काही निर्णय घेतले आहेत. मात्र, त्यात वंशावळी असणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार आहे. परंतु, आमच्याकडे वंशावळी नाहीत. त्यामुळे वंशावळी हा शब्द वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार अशी सुधारणा करा. ही सुधारणा करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामध्ये थोडा बदल करा सरसकट मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे.





