Home ब्रेकिंग न्यूज माईण नंबर १ शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा.!

माईण नंबर १ शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा.!

44

कणकवली :  तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माईण नंबर १.येथे मोठ्या उत्साहात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.
प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व उपस्थित माता पालकांनी शिक्षकदिनानिमित्त उपक्रमशिल पदवीधर शिक्षिका सौ. प्रतिक्षा तावडे यांना गुलाबपुष्प देऊन गुरुवंदन केले.

इ.५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती आपल्या भाषणातून दिली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते .भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळालेल्या होता. ते एक आदर्श शिक्षक, तत्वज्ञ, दूरदर्शी, व समाजसुधारक होते. त्यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती शिक्षिका सौ. तावडे यांनी आपल्या भाषणातून दिली.
त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापणाला सुरुवात झाली. इयत्ता ७ वी चे विद्यार्थीच बनले शिक्षक. इयत्ता पहिली ते ६ वीच्या वर्गावर त्यांनी अध्यापणाला सुरुवात केली. दररोज आपल्याबरोबर असणारे विद्यार्थी शिकवायला आले .याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मुले त्यांच्याशी बिनधास्तपणे बोलत होती. सांगितलेल्या कृती आनंदाने करत होती. शेवटची शारिरीक शिक्षणची तासिका मैदानावर घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
त्यानंतर आजचा दिवस कसा वाटला ? याविषयी आपले मत व्यक्त करण्यासाठी तावडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळ दिला. इ १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. असा शिक्षकदिन प्रत्येक वर्षी साजरा व्हावा, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शेवटी आजच्या दिवशीचे शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सांभाळल्याबद्दल मुलांचे अभिनंदन करण्यात आले.