सावंतवाडी : दि. ५ सप्टेंबर रोजी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी पुष्पहार अर्पण केला. व त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली.
याच दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापनाचे काम केले. त्यानंतर प्रशालेच्या हॉलमध्ये विविध करमणुकीचे कार्यक्रम करुन या कार्यक्रमाची सांगता झाली.





