‘या’ प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापन अनुभव..!

28

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ‘विद्यार्थी शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी विद्यार्थीच शिक्षक झाले आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ही विद्यार्थीच झाले. शाळा व्यवस्थापन आणि शिस्त यांचे नेटके नियोजन करून विद्यार्थी शिक्षकांनी शाळा उत्तम पद्धतीने चालवून दाखविली.

दिवसभरात विविध उपक्रम व अध्यापन करत करत आपण शिक्षक झाल्यावर किती जबाबदारी वाढते, यांचाही अनुभव घेतला. या शिक्षक दिनाचे मुख्याध्यापक म्हणून कु. मुसळे व पर्यवेक्षक म्हणून कुमार. केतकर यांनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली.

विविध विषयांचे शिक्षक विद्यार्थीच बनले होते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर मिटींगही घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थांना मार्गदर्शन अच्युत वणवे सर, जे. जे. शेळके, सौ. केळुसकर मॅडम यांनी केले. मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक सौ. जाधव मॅडम सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .