सावंतवाडी : दहीहंडीबाबत उच्च न्यायालयाने उंचीची मर्यादा तसेच वयोगटाची मर्यादा न्यायालयाने घालून दिली असताना न्यायालयाच्या आदेशाचा भंग काही मंडळ करत असतात आणि उंचीची मर्यादा वाढवल्याने जादा थर लावून दहीहंडी फोडतात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
आपल्या निवेदनात ते म्हणतात, आपले हिंदू धर्मातील श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात आपण सर्वजण साजरा करत असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच सायंकाळी दहीहंडी फोडत असतात प्रत्येक आपल्या जिल्ह्याचे राज्यांमध्ये सार्वजनिक मंडळ आकर्षित लाखो रुपयांची बक्षीस लावून उच्च न्यायालयाने उंचीचे मर्यादा तसेच वयोगटाची मर्यादा न्यायालयाने घालून दिली असताना न्यायालयाच्या आदेशाचा भंग काही मंडळ करत असतात आणि उंचीची मर्यादा वाढवल्याने जादा थर लावून आकर्षिक आर्थिक बक्षिसे लावून तरुण युवकांना या बक्षिसाच्या आकर्षणामुळे जिल्ह्यात व राज्यात हे युवक दहीहंडीचे जादा थर लावून ते कोसळल्याने अनेक युवकांना थर कोसळल्याने मृत्युमुखी पडतात किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते व आनंदाच्या काळामध्ये दुःखाची लाट कोसळ्याने कित्येक युवकांचे कुटुंब उध्वस्त होते. काही कुटुंबाला आर्थिक संकटातून जावे लागते. कमावता मुलगा असेल तर त्या युवकाच्या पत्नीला व त्यांच्या आई-वडिलांना दुःखाच्या प्रसंगामध्ये आयुष्यभर राहावे लागते.
तसेच त्या युवकाच्या पत्नीच्या मुलांना शिक्षणासाठीसुद्धा त्या मुलांची स्वप्ने अपूर्ण राहतात. यासाठी काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाची सरकार असताना याची दखल कित्येक मृत्युमुखी व अपंगत्व आलेल्या युवकांच्या आई-वडिलांनी सरकारकडे निवेदन देऊन सुद्धा सरकारने या उंचीची मर्यादेची दखल सरकारने न घेतल्याने त्यामध्ये काही पालक उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केल्याने उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामध्ये दहीहंडी फोडण्याचे सार्वजनिक मंडळ सर्व पक्षाच्या व्यक्तींसाठी न्यायालयाने दहीहंडी फोडण्यासाठी उंचीची मर्यादा तसेच दहीहंडी फोडण्यासाठी वयोमर्यादा घालून दिली आहे.
आपले दैवत श्रीकृष्ण हे आपल्या बालगोपालांसह दहीहंडी फोडत होते. ती दहीहंडी घरातच फोडत होते. परंतु आजकालचे तरुण उत्साही मंडळांनी तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाचे नागरिकांनी दक्षता न घेता उत्साहाच्या वातावरणात उंचीवर थर लावून तसेच जीवघेणे प्रसंग घडतात, त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच असा प्रसंग हिंदू धर्मातील युवकांच्या कुंटुंबावरती येऊ नये, म्हणून माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अश्या प्रकारची सूचना व नोटीस सिंधुदुर्ग जिल्हा व सार्वजनिक मंडळांना तसेच विविध पक्षाचा राजकीय पक्षांना नोटीस बजावुन अंमलबजावणी करावी, अशी विनंती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सावंतवाडी येथील जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





