सहवेदना – सहदेव परब (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने निधन..!

34

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड – गावठणवाडी येथील रहिवासी तसेच मातोंड देवस्थानचे मानकरी सहदेव पाये परब (गुरुजी) याचे वयाच्या ९२ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते निवृत प्राथमिक शिक्षक होते.

मांतोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच गावठणवाडीचे वाडेप्रमुख म्हणून त्यांना मान होता.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, असा मोठा परिवार आहे.
देवस्थान मानकरी दीपक परब, सावंतवाडी येथील महालक्ष्मी रेस्टोरंटचे मालक प्रदीप परब व सुनील परब यांचे ते वडील तर पत्रकार दीपेश परब यांचे ते आजोबा होत.