नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातनसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधी यांच्या ‘सनातन धर्मा’शी संबंधित विधानाला ‘योग्य उत्तर’ द्यावे, असं त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान मोदींनी ही सूचना केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनातन वादावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना उदयनिधी स्टॅलिन यांच्या या विधानाचे उत्तर द्यावे, अशा सूचना केल्या. त्याचवेळी त्यांनी मंत्र्यांना भारत विरुद्ध इंडिया मुद्द्यावर प्रतिक्रिया देणे टाळण्याच्या सल्ला दिला.
G20 बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना दिल्लीत राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येकाने G20 अॅप डाउनलोड केले पाहिजे आणि या काळात व्हीआयपी संस्कृतीपासून दूर राहा,असेही सांगितलं.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा चौफेर विरोध होत आहे. भाजपने याचा तीव्र निषेध केला आहे. याशिवाय ‘इंडिया’ आघाडीत सहभागी इतर पक्षांनीही उदयनिधींना अशी विधाने टाळण्याचा सल्ला दिला आहे.
डीएमके हा काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना विचारले असता ते म्हणाले, “आमची भूमिका स्पष्ट आहे. सर्वधर्म समभाव ही काँग्रेसची विचारधारा आहे, परंतु तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.





