सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे कार्यालयात झालेल्या वीज वितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपकार्यकारी अभियंता वाघमोठे यांनी मळेवाड नाईकवाडी येथे आज ट्रांसफार्मर बसवून देतो असे दिलेले आश्वासन पूर्ण करत वाघमोठे यांनी आपला शब्द पाळला आहे.
मळेवाड – नाईकवाडी येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड असल्याने नाईकवाडी परिसरातील ग्राहकांना लो होल्टेजची समस्या गेले कित्येक दिवस भेडसावत होती. तसेच विजेच्या अनेक समस्या ग्राहकांना असल्याने मंगळवारी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत कार्यालयात वीज वितरण अधिकारी व ग्राहक अशी एकत्रित बैठक ग्रामपंचायतकडून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्राहकांनी नाईकवाडी येथील ट्रान्सफॉर्मरबाबत असलेली समस्या उपकार्यकारी अभियंता वाघमोठे यांच्यासमोर मांडले असता त्यांनी बुधवारी आपण ट्रान्सफॉर्मर नव्याने बसवून देतो, असे आश्वासन दिले होते.
आज नाईकवाडी येथे सदरचा ट्रांसफार्मर बसवल्याने वाघमोठे यांनी काल बैठकीत दिलेला शब्द पूर्ण करत आपला शब्द पाळल्याने बैठकीचे फलित झाले असल्याचे ग्राहकातून समाधान व्यक्त केले जात असून इतरही समस्याबाबत वाघमोठे यांनी दिलेले आश्वासने पूर्ण करावे , अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.





