‘त्या’ पोलिसांवर कारवाई करावी..! – संजू परब. ; मराठा समाज बांधवांचे निवेदन.

102

सावंतवाडी : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर दोन दिवसांपूर्वी मराठा बांधवांवर काहीही कारण नसताना पोलिसांनी नाहक लाठी चार्ज केला आहे. या लाठी हल्ल्याचा मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करीत आहोत. तसेच संबंधित लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी या निवेदनाद्वारे मराठा समाजातर्फे मागणी करत आहोत, असे निवेदन उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांना मराठा समाजाच्या वतीने संजू परब यांनी दिले आहे. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.