बापरे ..! आरोंदा येथे एकावर प्राणघातक हल्ला..!

1753

सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील गणपत नाईक (वय ६५. राहणार आग्राळवाडी, आरोंदा) यांच्यावर दोन जणांनी प्राण घातक हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.४५ वाजता गणपत नाईक हे आपल्या शेतात तुमचे बैल गेले व शेतीचे नुकसान केले, हे सदर आरोपीला सांगायला गेले.

या दरम्यान संशयित आरोपी हरी शिवराम नाईक यांनी कोयत्याने डोक्यावर दोन वार केले तर दुसरे संशयित आरोपी रमाकांत शिवराम नाईक यांनी दांड्याने मारहाण केली व चेहऱ्यावर बुक्क्याने मारहाण केली. सदर मारहाणीत गणपत नाईक यांच्या डोक्याला, हाताला व डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना तात्काळ बांबोळी – गोवा येथे हलविण्यात येऊन त्यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे.