चेन्नई : तामिळनाडू सरकारने येत्या शैक्षणिक वर्षासाठी ‘चांद्रयान-3’ च्या यशाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. असा खुलासा त्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अनलि महेश यांनी एका मुलाखतीत केला आहे.
याबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चांद्रयान-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित केले गेले होते, तर विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आणि इतिहास रचला.





