मुंबई : I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीवर भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी सडकून टीका केली होती. त्यावर उठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. निलेश राणे आणि नितेश राणे या राणे पुत्रांवर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलंय. त्यामुळेच ते I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीवर किटकांसारखे टीका करत आहेत, असा टोला सुषमा अंधारेंनी राणे पुत्रांना लगावला आहे.





