नवी दिल्ली : भारताचा गोल्डनबॉय नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. अवघ्या काही सेंटीमीटरने नीरजला सुवर्णपदकापासून लांब राहावे लागले आहे. नीरजने 85.71 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. पण त्याचवेळी झेकच्या जेकब वडलेचने 85.86 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक आपल्या नावे करून घेतलं. त्यामुळे नीरजला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी अॅथलेटिक्स विश्वचषक बुडापेस्टमध्ये 88.17 मीटरमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले होते.





