- देवगड : जलजीवन मिशन अंतर्गत ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य व ग्रामपंचायत स्तरावरील भागदार यांचे दोन दिवशीय अनिवाशी प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना बापर्डे सरपंच श्री . संजय लाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
- यावेळी बापर्डे सरपंच संजय लाड यांनी जल जीवन मिशन या कार्यक्रमाचे उद्दिष्टे, तसेच बापर्डे गावाची यशोगाथा याबाबत मार्गदर्शन केले . तर मनुष्यबळ विकास समन्वयक श्रीम . इंदीरा परब यांनी जल जीवन मिशन व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले . तसेच पाणी गुणवत्ता समन्वयक हर्षदा बोथीकर यांनी पाणी गुणवत्ता व्यवस्थापन व सर्वेक्षण आणि सुरक्षित पाणी पुरवठा याबाबत मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेच्या प्रमाणपत्र वितरणावेळी बापर्डे सरपंच श्री . संजय लाड , ग्रामपंचायत सदस्य श्री . अतुल राणे , मनुष्यबळ विकास समन्वयक श्रीम . इंदीरा परब, गटसमन्वयक श्रीम . वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ श्रीम . हर्षदा बोथीकर , श्री .उमेश सकपाळ , श्री . प्रज्वल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .या प्रशिक्षणाला देवगड तालुक्यातील २० गांवातील ग्राम पाणी पुरवठा सदस्य , आशा , अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी, जलसुरक्षक सहभागी होते.





