खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा होणार.! ; CM शिंदेंची मोठी घोषणा.!

70

मुंबई : भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक कोणी मिळवून दिले? हा महाराष्ट्रचं नव्हे तर भारताच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न. महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देत त्यांनी जगात भारताची मान उंचावली.

त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचाही गौरव वाढला. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानामुळे त्यांचे नाव आजही अजरामर आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्याला हजर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,” जसा ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय. महाराष्ट्रातल्या मातीतला सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव, ज्यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र्य भारतासाठी पहिलं पदक जिंकलं. त्यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करतो.”

यावेळी एकनाथ शिंदेंनी अजित पवारांनी केलेल्या मागण्या देखील पुर्ण केल्या. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम १ लाखावरुन ३ लाख आणि ३ लाखाच्या पुरस्काराची रक्कम ५ लाख करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राचेही अभिनंदन केले.