GOOD NEWS – आरोग्य विभागात जम्बो भरती..! ; उद्या निघणार जाहिरात, आरोग्यमंत्र्यांची माहिती.

48

मुंबई : अनेक काळापासून राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळं सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारनं आरोग्य विभागात ११ हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उद्याच जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली.

आरोग्य विभागातील भरतीसाठी खरंतर मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच जाहिरात निघाली होती. पण या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळं ही भरती प्रक्रिया रद्द झाली होती. सरकारवरही अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता सध्याच्या महायुतीच्या सरकारवर भरतीसाठी दबाव वाढत होता. त्यानुसार, आता ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.