बांदा : स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय देशभक्ती गायन स्पर्धेत व्ही.एन. नाबर इग्लिश मिडीअम स्कूल बांदा शाळेला प्रथम क्रमांक मिळाला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा, सावंतवाडी येथे सदर स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत देशभक्तीपर प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय शहीदांचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रात्त स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी आणि सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल च्या शिक्षका सौ.स्नेहा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन मंगेश कामत, ट्रस्टी पदाधिकारी, प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे



