बांदा : गोव्यातून महाराष्ट्रात गोवा बनावटीच्या दारूची आलिशान कारमधून अवैध वाहतूक करताना उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई करत ३ लाख ६१ हजार ७६० रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बांदा- दाणोली मार्गांवर करण्यात आली. याप्रकरणी मयूर रवींद्र माने, विनोद विठ्ठल माने, सुशांत अशोक गायकवाडी (रा. तासगाव, सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले. या दारू वाहतूक प्रकरणात वापरण्यात येणारी इटिंगा कार व पायलटिंग करणारी दुचाकीही जप्त करण्यात आली.



